डाॕ.श्रध्दा जवंजाळ यांचा सन्मान करुन ” महाराष्ट्राची हिरकणी ” हा पुरस्कार प्रदान

उपसंपादक हुसेन मुलाणी
महाराष्ट्राची लेक ,माहेरचा कट्टा, हिरकणी फाउंडेशन तसेच नवी मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “महाराष्ट्राची हिरकणी ” हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२३ दिनांक २९ मार्च २०२३ रोजी वारकरी भवन, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर येथे संपन्न झाला आणि पुरस्काराच्या मानकरी ” डाॕ. श्रध्दा जवंजाळ ” यांना अनेक दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला .

याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम, नवी मुंबईच्या डेप्युटी आरटीओ हेमांगी पाटील मॅडम, नवी मुंबईच्या अँटिकरप्शन ब्युरो डी. वाय. एस. पी. ज्योती देशमुख, मुंबईच्या राज्यकर उपायुक्त स्वाती थोरात, फॉरेस्ट ऑफिसर सपना बीरारी. आदि मान्यवर उपस्थित होत्या ,

या पुरस्कार सोहळ्या निमित्त पुरस्कार कर्त्या श्रध्दा जवंजाळ यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला

हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका ढाणे, नीलम विसपुते, वर्षा नागरे, कविता कोंडभर, पूनम दुसाने, कौसर शेख, जयश्री शेलार, अजित कौर दिल्हन, तसेच श्रीनिवास ओहोळ यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमा चे सुञसंचलन श्रेया राजापूरकर यांनी केले.

डाॕ.श्रध्दा जवंजाळ यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल “टाइम्स 9 मराठी न्युज चॕनेल च्या सर्व समुहा च्या वतीने “हर्दिक–हर्दिक अभिनंदन”