महाराष्ट्र
सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न…

आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आज सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.या प्रसंगी आ रणजितसिंह मोहिते-पाटील साहेब आणि खा धैर्यशील मोहिते-पाटील साहेब उपस्थित होते…

यंदा चांगल्या पावसामुळे उजनी धरण पुर्ण क्षमतेने लवकरच भरणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तलाव आणि सर्व योजनांना पाणी सोडण्यात यावे,जिल्ह्यातील पुनर्वसित गावांच्या समस्या,करमाळा आगाराकडे एस टी बसेसची कमतरता,टेंभुर्णी जातेगाव नॅशनल हायवेच्या भुसंपादनातील अडचणी,जलजीवन योजनेची रखडलेली कामे,भुमी अभिलेख विभागात जनतेला होणारा त्रास,अशा विविध विषयांवर सुचना मोहिते-पाटील बंधूंनी मांडल्या…

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार,आमदार तसेच नियोजन समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते…



