महिलेचा विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या अंबादास ओरसे यांना माळशिरस डिस्ट्रीक अँड सेशन कोर्टाने केला जामीन मंजुर

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सुमित्रानगर-यशवंतनगर, ता. माळशिरस येथे भाड्याने रहात असलेल्या महिलेचा तिच्या घरात घुसुन विनयभंग केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ओरसे आणि तिघे यांच्यावर अकलूज पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने अंबादास ओरसे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्यास कोर्टाने काही अटीनुसार जामीन मंजूर केला आहे

याबाबत पालीसांकडून मिळालेली माहिती अशी की, एक ३५ वर्षीय तरूणी सुमित्रानगर येथे तिच्या कुटूंबासह भाड्याने रहात आहे. दि. २४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता तिच्या घराखाली काही व्यक्ती तिच्या घरमालकाला मारहाण व शिवीगाळ करत असताना तिला दिसले. त्यानंतर तिने खाली येवून यांना का मारता, त्यांची काय चुक आहे असे विचारले असता अंबादास ओरसे व त्याच्या मुलाने सदर महिलेला धक्काबुक्की, शिवीगाळ करत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची पिर्याद सदर महिलेने अकलूज पोलीसांत दिली होती
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत. तू आमच्या नादाला लागू नको असे म्हणत तिला लाथाबुक्क्याने मारहाणही केली. सदर महिला जास्त आराडा ओरडा करू लागताच अंबादास ओरसे, त्याचा मुलगा व अन्य दोघे इसम त्यांनी आणलेल्या चारचाकी गाडीतून पळून गेले अशी फिर्याद या महिलेने अकलूज पोलीसांमध्ये दिली होती आणि अकलुज पोलिस स्टेशन मध्ये अंबादास ओरसे यांच्या विरुध्द . भारतीय दंड विधान कलम 323 354 452 504 506 34 प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचा व बहुजन नेतृत्व नष्टनाभूत करण्याचा प्रयत्न होता याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

माञ माळशिरस न्यायालयाने आज, आरोपी अंबादास सायबु बोरसे यांना अकलूज पोलीस ठाणे कडून गुन्हा रजिस्टर नंबर 181 2023 चे कामी 25000 इतक्या रकमेच्या वैयक्तिक मुचलक्या वर व तितक्या च रकमेच्या स्वातंत्र जामीनदाराचे जामीन कदबा बंधपञा देऊन आणि सदरील आदेश दिनांक 11 एप्रिल 2023 पर्यंत खालील अटी व शर्ती अमलात आणाव्यातअशा एकूण 9 अटी नुसार जामीन देण्यात आला.



