महाराष्ट्र

माळीनगर येथे ॲग्रीस्टॅक शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो 9921500780

अकलूज प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, माळशिरस तहसिलदार सुरेश शेजूळ यांच्या सूचनेनुसार ग्राम महसूल अधिकारी कार्यालय माळीनगर येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त ॲग्रीस्टॅक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरात पंचक्रोशीतील १०० हून अधिक शेतकऱ्यानी आपली नोंदणी पूर्ण केली.ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या सातबाराला त्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक जोडला जाणार आहे.शेतकऱ्यांना कृषि विषयक सर्व प्रकारचे शासकीय अनुदान व शासकीय योजनांचा लाभ घेणे साठी सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फॉर्मर आयडी काढणे आवश्यक असल्याने अद्याप ज्या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली नसेल त्यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन ग्राम महसूल अधिकारी नेहाल जाधव यांनी केले.

या शिबिरावेळी शेतकरी वसंतराव खराडे, विराज निंबाळकर,राहुल कुदळे,देविदास बोरावके,सचीन शिंदे,हनुमंत मोरे,घुळदेव चोरमले,अतिष खराडे,महेश खराडे,बालिश शेख,महसूल सेवक बाळू हंकारे,अविनाश चक्रे आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button