महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 23 मार्च 2023 ते 6 एप्रिल 2023 पर्यंत जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

उपसंपादक हुसेन मुलाणी मो.नं.9730867448

ज्याअर्थी, मा.पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांनी त्यांचे पत्र दि.21/03/2023 नुसार उस्मानाबाद जिल्हयात खालील प्रमाणे सण/उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी
संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप,रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्‍कम मिळणे आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष/संघटना यांचे कडुन धरणे, मोर्चे उपोषण, आत्म्मदहन, बंद,निदर्शने,तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद जिल्हयात ग्रामीण/शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा/’जत्रा!ऊरूस लहान मोठया स्वरूपात साजरे करण्यात येतात. व्यक्‍ती,व्यक्‍ती समुह तसेच विविध पक्षांसंघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे अंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिनांक 30/03/2023 रोजी श्रीराम नवमी हे सण साजरे होणार आहे. दिनांक 04/04/2023 रोजी महावीर जयंती हे सण/उत्सव साजरे होणार आहे. दिनांक 04/04/2023 ते दिनांक 06/04/2023 या कालावधीत श्री तुळजाभवानी चैत्री पोर्णिमा यात्रा संपन्न होणार आहे. दिनांक 06/04/2023 रोजी हनुमान जयंती हे सण/उत्सव साजरे होणार आहे. तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण उत्सव व आंदोलनात्मक कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हयात शांततेत पार पाडण्याकरिता

तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 23/03/2023 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 06/04/2023 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण उस्मानाबाद जिल्हयात जारी होणेस विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, मा.पोलिस अधिक्षक उस्मानाबाद यांचे अहवालावरुन जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्याची खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, मी शिवकुमार स्वामी, अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद,याना आदेशाव्दारे असे निर्देश देत आहे की, शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातुन उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 23/03/2023 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 06/04/2023 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्जरबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

1.शस्त्र,सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणार नाहीत. ” 2.लाठया,काठया,शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील,सहज हाताळता येतील,अशा वस्तु बाळगणार नाहीत. 3.कोणतेही दाहक पदार्थ व स्फोटके जवळ बाळगणार नाहीत. 4.दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत. 5.आवेशी भाषणे, अंगविक्षेपण,विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता,नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रेनिशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत. 6.जाहिरपणे घोषणा करणे,गाणी म्हणने,वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत. 7.व्यक्‍तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. 8.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती चा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/मोर्चा काढता येणार नाही.

हा आदेश आज दिनांक 23/03/2023 रोजी अप्पर जिल्हा दंडावधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या सही व शिक्यानिशी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button