महाराष्ट्र

बावडा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमुळे बावडा गावाच्या वैभवाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला – भाजपा नेते हर्षवर्धन पाटील.बावड्यातील सहा डॉक्टरांमुळे रुग्णांची अत्याधुनिक उपकरणामुळे चांगली सोय.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123

बावडा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलने गुढीपाडव्यानिमित्त शुभारंभ करून बावडा गावाच्या वैभवाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून मी गावचा नागरीक म्हणून अभिमान असल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.

बावडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बावडा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचा गुढीपाडव्यानिमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ एम. के. ईनामदार यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आला. यावेळी विलास वाघमोडे, अशोक घोगरे, श्रीमंत ढोले, मनोज पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, किरण पाटील, अमर पाटील, चित्रलेखा ढोले, डॉ अविनाश पानबुडे, डॉ राजीव राणे, डॉ कमलाकर व्होरकाटे, डॉ लक्ष्मण आसबे, सुरेश शिंदे, नागेश गायकवाड, मनोज जगदाळे, विजय घोगरे, उमेश घोगरे, निलेश घोगरे, नामदेव घोगरे, बाबूलाल डांगे, भैय्या घोगरे, सिध्दार्थ साळूंखे आदिंसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिक सुखसुविधा असणाऱ्या उपकरणांची उपलब्धता मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. पंचवीस खाटांमध्ये सात खाटांचे अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, स्त्री रोग प्रस्तुतीविभाग रूग्णवाहिका असे सुसज्ज दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे. डॉ ईनामदार यांनी गेल्या ४४ वर्षात वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. रुग्णांप्रती लागत असल्याने चोवीस तास माणूसकी प्रती सर्व शक्ती पणाला लावून काम करतात. ईनामदार यांच्या दवाखान्यात एकाच छताखाली सर्व सेवा देणारे माणसांचे देव, दैविशक्ती असणारे माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांना पद्मभूषण पुरस्कारासाठी केंद्राकडे प्रयत्न केला, त्यांचा खराच हक्क त्या पुरस्कारावर असल्याने यापुढेही त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बावडा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी डॉ.भुषण चंकेश्वरा, डॉ. अमोल फडे, डॉ. शैलेश गायकवाड, डाॅ. अविनाश पानबुडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वांनी माणूस धर्माप्रती आपली श्रद्धा व निष्ठा पाळत काम करावे.

अध्यक्षयी भाषणात डॉ ईनामदार म्हणाले, मागील ४४ वर्षात सर्वांसाठी जे केले त्याचीच पोचपावती म्हणून समाज माझा मान सन्मान करत आहे. आम्हाला पुर्विच्या काळी रुग्णांसाठी सेवा देताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. परंतू तुम्ही नशीबवान आहात की सध्याला तुमच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याच्या आधारावर अशक्य ते शक्य करता येणार आहे. मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल हे बावड्याचे वैभव ठरो, रूग्णांना सर्व प्रकारच्या सेवा मिळून ते चांगल्या पद्धतीने यशस्वी होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.

बावडा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलची उभारणी डॉ. जय शंकर चंद्रकांत विभुते, डॉ. प्रशांत गोरख शिंदे, डॉ. संतोष किसनराव खाडे, डॉ. भागवत दादा जाधव, डॉ. इंद्रजीत प्रवीण दोशी, डॉ. नेहल बाहुबली शहा यांनी केली आहे. अकलूज इंदापूर मार्गालगत सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. आतापर्यंत रूग्णांना इंदापूर, अकलूज, बारामती तसेच पुणे यांसारख्या शहरात जावे लागत होते. परंतू बावडा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमुळे रूग्णांची चांगली सोय होणार असल्याचे डॉ जयशंकर विभूते यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संतोष खाडे यांनी केले तर सूत्रसंचालन अमर निलाके सर यांनी केले स्वागत सर्व डॉक्टर व कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले तर आभार डॉ. इंद्रजीत दोशी यांनी मानले. कार्यक्रमास बावडा पंचक्रोशीतील सर्व मान्यवर पदाधिकारी नागरिक प्रतिष्ठित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button