शाहरुख मुलाणी यांची मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य,सचिव आणि मंत्रालय कामकाज सचिव पदी निवड…

मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रशिदभाई मुलाणी यांनी सर्वानुमते केली निवड…
आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रशिद (भाई) शेख यांच्या सामाजिक दूरदृष्टी नजरेतून आपल्या अल्पसंख्याक समाजातील कोणीही कुठे हि कशाच्या हि अभावी थांबला नाही पाहिजे,अल्पसंख्यांक समाजातील तरुणांनी महाराष्ट्राच्या मंत्रालया पर्यंत जाऊन आपली कामे करून घेतली पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्यच्या सचिव पदी तसेच मंत्रालयीन कामकाजाच्या सचिव पदी मुळचे आपल्या सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे शाहरुख मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

शाहरुख मुलाणी यांची मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य चे सचिव आणि मंत्रालयातील कामकाजाचे सचिव पदी निवड झाल्याने अल्पसंख्याक समाजातील अनेक युवकांनी आनंद व्यक्त केला आणि शाहरुख मुलाणी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…



