शहर

युवासेने तर्फे पालघर जिल्ह्यातील पोलिसांना अल्पोपहार वाटप

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक- -7030516640

श्री गणेश चतुर्दशी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातीलच न्हवे तर देशभरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा समारोपाचा दिवस…गणपती विसर्जनाचा दिवस….

स्वतः च्या कुटुंबा पासून दूर राहून, स्वतः च्या सण – उत्सवावर आणि मुला बाळांच्या आनंदावर विरझण टाकून सर्व सामान्य जनतेला सण उत्सव आनंदात सुखात आणि सुरळीत साजरे करता यावा म्हणून अहोरात्र सुरक्षा पुरवणारे आपले महाराष्ट्र पोलीस….
कोणताही सण असला तरी कायम कर्तव्य बजावत असणारे आपले महाराष्ट्र पोलीस… आज ज्यांच्या मुळे आपण सुरक्षित आहोत ते आपले महाराष्ट्र पोलीस….

अनंत चतुर्थदशी च्या दिवशी सकाळी पासून दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत अगदी शेवटच्या गणपती चे विसर्जन होऊन जनजीवन सुरळीत होई पर्यंत कर्तव्य बजावत असणारे आपले महाराष्ट्र पोलीस… आणि ह्या सर्वांची कृतकृत्यता म्हणून नवनिर्वाचित युवासेना पालघर जिल्हायुवाधिकारी रॉकी नारायण तांडेल ह्यांनी युवासेना पालघर विस्तारक विश्वास पाटेकर, आसनी किरण फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली युवसेनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील (बोईसर, पालघर आणि डहाणू विधसनसभा क्षेत्रातील) बंदोबस्ता वर असणाऱ्या सर्व पोलिस बंधू भगिनींना फराळ, अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी यांचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी प्रामुख्याने पालघर पोलीस स्टेशन, केळवे सागरी पोलीस स्टेशन, सातपाटी सागरी पोलीस स्टेशन, सफाळे पोलीस स्टेशन, मनोर पोलीस स्टेशन, बोईसर पोलीस स्टेशन (MIDC), पाचमार्ग पोलीस स्टेशन, डहाणू पोलीस स्टेशन, तलासरी पोलीस स्टेशन यांना युवासेना पालघर बोईसर, पालघर आणि डहाणू विधानसभा) जिल्हायुवाधिकारी श्री. रॉकी नारायण तांडेल आणि त्यांच्या टीम ने प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांना अल्पोपहार भेट दिला….
पोलिसांच्या कार्य बजावत असलेल्या कर्तव्याचा आदर ठेवून सबंध पोलिस बांधवांच्या प्रति राबविलेल्या प्रेमळ उपक्रमाचा सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आणि पोलीस बंधू भगिनींनी युवासेनेच्या ह्या कार्याचे कौतुक केले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारणातील तत्त्व म्हणजे ८०% समाजकारण २०% राजकारण ह्या तत्वाने ह्या पुढेही युवा सेना आणि शिवसेना यांच्या मार्फत असे समज ऊपयोगी उपक्रमांचे आयोजन करत राहू असे युवाजिल्हाधिकारी रॉकी तांडेल यांनी सांगितले.

त्यावेळी, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी रॉकी तांडेल शिवसेना पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज संखे, केळवे गावचे माजी सरपंच भावना किणी, शिवसेना पालघर तालुकाप्रमुख नचिकेत पाटील, युवा सेना भिवंडी विस्तारक जस्विन घरत, युवा सेना उपजिल्हाधिकारी कृतार्थ पाटील, विधानसभा समन्वयक दीपक मोरे पालघर तालुका समन्वयक वैभव पाटील व प्रतीक पाटील, युवा सेना पालघर शहर युवधिकारी निमिष पाटील,युवासेना उपविधानसभा युवधिकारी पंकज ठाकूर व चिराग संखे, युवासेना तालुका चिटणीस आजिंक्य देव, युवासेना डहाणू तालुका युवधिकारी विपुल पाटील आणि शिवसैनिक युवासैनिक उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button