महाराष्ट्र

संजय राऊत…हे एक लढवय्या झुंजार नेता—अतुलराजे भंवर

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

सहसा मी जास्त प्रवास करीत नाही पण मुंबईला कधीतरी येत जात असतो.मुंबई म्हटल्यावर मला फक्त हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच डोळ्यासमोर येतात कारण जिथून शिवसेनेची सुरूवात झाली ते ठिकाण म्हणजे मुंबई.दसरा मेळावा,बाळासाहेबांची जयंती,स्मृतीदिन अगर शिवसेनेचा मोठा कोणता कार्यक्रम,आंदोलन असले की मी मुंबईला जात असतो.सोलापूर पासून ४५० किमी मुंबई असल्याने खूप पल्ला लांब वाटतो त्यामुळेच क्वचितच मुंबईला येणेजाणे असते.फेसबूक द्वारे मी माझे विचार मांडत असतो त्यामुळे मुंबई पुणेला कधी गेलो तर शिवसैनिक भेटत असतात माझ्याबरोबर फोटो काढतात त्यांच प्रेम पाहून मी खरोखर भारावून जात असतो.

मध्यंतरी मी साहेबांच्या स्मृतीदिना निमित्त साहेबांना अभिवादन करण्याकरीता शिवतिर्थावर गेलो होतो दिवसभर शिवसैनिक भेटले दूपारी मातोश्रीवर गेलो संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेबांमुळे मला मातोश्रीत जाणे शक्य झाले तिथे साहेबांच्या आसनाचे दर्शन घेतले मग नंतर प्रभादेवी कडे वळालो.प्रभादेवी मधील सामना कार्यालयाच्या गेटवर गेलो तेथील पोलिसांनी मला विचारल कोणाला भेटायच आहे ?? मी म्हणालो राऊत साहेबांना त्यांनी वरी फोन केला आणि माझा परीचय सांगितला तेथून निरोप आला त्यांना वरी पाठवून द्या…,
वरी दुसर्या मजल्यावर सामना ऑफीसमधे राऊत साहेबांना भेटण्याकरीता शिवसेनेचे पदाधिकारी आले होते त्यामुळे मला एका रूममधे बसविले चहापाणी दिले नंतर राऊत साहेब फ्री झाल्यावर मला आत बोलावलं.मला पाहताच संजय राऊत साहेब म्हणाले “अतुल ये ये तुझे लेख माझ्या कार्यालयातील माणस मला दाखवितात तुझे व्हिडिओ मी पाहत असतो खूप छान काम करतो तू..” हे राऊत साहेबांचे शब्द होते मी राऊत साहेबांना वंदन केल नुकतेच ते इडीच्या जेलमधून बाहेर आले होते.अनेक विषयावर चर्चा झाली सोलापुरातील राजकारणाविषयी चर्चा झाली.मी राऊत साहेबांना म्हटल साहेब तुम्ही माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाची दखल घेतली आज मला मी केलेल्या कार्याचे चीज झाल्यासारखे वाटले ४० गद्दार फुटले पण तुम्ही एकनिष्ठ राहिलात याचा आम्हाला अभिमान आहे असे मी साहेबांना बोललो..,साहेब बोलले असेच काम करीत रहा मी तुझ्या पाठीशी आहे..तेथून सविस्तर चर्चेनंतर मी सोलापूरला रवाना झालो.

सोशलमिडिया द्वारे आपण जे तळमळीने काम करतो त्या कामाची दखल जर आपले नेते घेत असतील तर त्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाही.
संजय राऊत २४ तास शिवसेनेसाठी लिहितात बोलतात पत्रकार परीषदा घेतात हे कशासाठी करतात ? शिवसेनेसाठीच ना ! मग अशा नेत्याचा अभिमान प्रत्येक शिवसैनिकाला असलाच पाहिजे.मातोश्रीशी इमान असणार्या नेत्यांमधे जर अग्रेसर नाव कोणाच असेल तर मी म्हणतो संजय राऊत आहेत बाकीचेही भरपूर नेते आहेत त्यांचाही खारीचा वाटा आहे पण संजय राऊत हे रसायन फार वेगळं आहे.

४ वेळा दिल्लीत ते शिवसेनेचे नेतृत्व करीत आहेत एक उत्तम पत्रकार परखड पत्रकार,वक्ता म्हणून प्रत्येक पत्रकारांनी राजकीय नेत्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.सत्य बाजू मांडणे ज्याला जमत तोच खरा पत्रकार असतो.संजय राऊत यांच्याकडे एका पक्षाचा नेता पाहण्यापेक्षा एक पत्रकार म्हणून जर का आपण पाहिल तर त्यांच्या मुलाखतीमधून लोकांच्या ज्या वेदना आहेत लोकांचे जे दुख: आहे ते त्यांच्या लेखनीतून अगर बोलण्यातून दिसून येत.एक पत्रकार काय करू शकतो हे दाखवून दिल आहे राऊत साहेबांनी.

कालपरवा बार्शीमधे एका अल्पवयीन मुलीची बोेटे छाटण्यात आली तीला रक्तबंबाळ केल तीच्यावर अन्याय अत्याचार केले बार्शीच्या एका बड्या नेत्याच्या लोकांनी हे कांड केले त्या आरोपींना पोलिस लवकर शोधत नव्हते पिडीतेच्या नातेवाईकांनी संजयजी राऊत साहेबांशी संपर्क साधला सदर मुलीला झालेल्या अन्यायाचा फोटो त्यांनी ट्वीटरवर टाकला आणि त्या घटनेला वाचा फोडली पण पोलिसांनी त्या घटनेचा तपास करण्याआधी राऊत साहेबांवर गुन्हा दाखल केला.जर एखाद्या निघृण घटनेची वाचा फोडण्यासाठी कोणी आवाज उठवत असेल तर पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत असतील तर या जगात न्याय मागायचा तर कोणाकडे ?? केवळ संजय राऊत शिवसेनेचे आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे टाकले जात असतील तर या महाराष्ट्रात वा देशात लोकशाही विकली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही.आज संजय राऊत यांनी वाचा फोडली नसती तर हे प्रकरण महाराष्ट्राला समजले असते का ? वा त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला असता का ? हा थेट सवाल त्या पोलिस कर्मचार्यांना आहे ज्यांनी लोकशाहीची हत्या केली.

जो तो उठतो संजय राऊत यांच्यावर बोंब मारतो.४० गद्दारांपैकी काही गद्दार तर रोज राऊत साहेबांना शिव्याशाप देत असतात.अरे गद्दार बांडगुळांनो इडीच्या भीतीने तुम्ही मातोश्रीला धोका दिलात देवासमान उद्धवसाहेबांना धोका दिलात राऊत साहेब इडीला न घाबरता १०० दिवस तुरूंगात राहिले परंतू त्यांनी भाजप समोर गुडघे टेकले नाहीत ना अभिमान विकला ना स्वाभिमान विकला..तुम्ही हरामखोरांनो तुमचा स्वाभिमान दिल्लीश्वरांच्या पायाखाली गहान ठेवला तुमची राऊत साहेबांवर टीका करायची अवकात नाहीच नाही.

काही आमदार म्हणतात आमच्या मतावर संजय राऊत खासदार झाले त्या बिनडोक शुन्य अक्कल असणार्या आमदारांना सांगू इच्छीतो की,
अरे तुम्ही जे आमदार झालात ना तुम्हाला निवडणुकीत जी मत मिळालीत ना., ती मत काय तुमच्या बापाने पैसे देऊन खरेदी केलेली मत नव्हती ती मत बाळासाहेब ठाकरे,उद्धवसाहेब ठाकरे,आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी दिलेली मत होती म्हणून तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात.तुम्हाला जो ए.बी फाॅर्म दिला होता त्या ए.बी फाॅर्मवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सही केली म्हणून तुम्ही निवडून आलात.राऊत साहेब तुमच्या मतावर खासदार नाही झाले तुम्हाला ज्या शिवसैनिकांनी मत देऊन निवडून दिल त्या शिवसैनिकांच्या मतामुळे राऊत साहेब खासदार झाले हे लक्षात ठेवा.

बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढायचा आणि तो पक्ष काही गद्दार लोकांना असाच बहाल करायचा ही काय बापाची खिरापत वाटली का ?? का बापाचा माल वाटला ? स्वत:चा बाप विसरून शेजार्याच्या बापाला माझाच बाप म्हणणार्या औलादी महाराष्ट्राने या ८-१० महिन्यात पाहिल्या आहेत.अशा औलादी शिवसेनेच्या नावाखाली मातोश्रीचं रक्त पित असतील उद्धवसाहेबांना वेदना देत असतील तर त्यांना जमीनीत गाडल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही.

प्रत्येक पक्षात एक तरी संजय राऊत असला पाहिजे जो पक्षाची बाजू पडत्या काळातही वाघासारखी लढणारा असायला हवा.आज आमच्या पक्षाला काही गद्दारांनी जरूर जखमी केल असेल तरंतू पक्षात संजय राऊत यांच्यासारखे हजारो वाघ आहेत लाखो शिवसैनिक आहेत.दिल्लीश्वरांच्या मदतीने गद्दार आज सत्ता भोगत आहेत उद्याचा येणारा दिवस हा आमचा असेल त्यावळेस प्रत्येक गद्दाराचा हिशोब हा होणार म्हणजे होणारच.

जय महाराष्ट्र.
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो नं 9960090001.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button