शहर

शिवापुर टोलनाक्यावर २ एप्रिलला सर्वपक्षीय आंदोलन

भोर प्रतिनिधि दत्तात्रय बांदल

केळवडे (ता. भोर) येथे शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीची बैठक पार पडली. टोलनाक्यावर सुरू असलेल्या सक्तीच्या टोलवसुली बाबत नागरीकांमधे संतप्त भावना निर्माण झाली असुन टोलनाक्याच्या स्थलांतराचा मुद्दा जाणीवपुर्वक बाजुला ठेऊन एन.एच.ए.आय. टोलवसुली सक्तीने करीत आहे अशी भावना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. “शिवापुर टोलनाका स्थलांतरीत करण्याची मागणी जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून होत असुनही NHAI व टोल प्रशासन मुजोरी करीत आहेत. यापुर्वी केलेल्या आंदोलनामधे टोल प्रशासनाने दिलेला शब्द फिरवला आहे.

आता टोलनाक्याचा अंतिम लढा २ एप्रिल रोजी टोलनाक्यावर दिला जाईल. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावागावात जाउन आंदोलन जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन कृतीसमितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी केले आहे. यावेळी प्रत्येक पक्षाच्या तालूका निहाय आंदोलकांच्या समितीची स्थापना करण्यात आली. सर्वपक्षीय मेळावे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधे घेण्यात येणार असुन काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, किसान मोर्चा या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्या विरूद्ध एल्गार केला. टोलनाक्यावर आरेरावी करणाऱ्या नाना कोंडे या व्यक्ती विरूद्ध कृती समितीच्या सदस्यांनी राजगड पोलीस स्टेशन मधे जाऊन तक्रार दिली.

या बैठकीला शैलेशदादा सोनवणे (अध्यक्ष-भोर तालुका काॕंग्रेस,बाळासाहेब गरुड (उपाध्यक्ष-पुणे जिल्हा, भाजपा) लहुनाना शेलार (मा.सभापती, पंचायत समिती-भोर) जिवन कोंडे (अध्यक्ष, भोर तालुका-भाजपा) माऊली शिंदे (शिवसेना,तालुकाध्यक्ष-भोर) आदित्य बोरगे (अध्यक्ष, युवा सेना-भोर) विठ्ठलदादा आवाळे (मा.सदस्य, जि.प.पुणे) दिपक दामगुडे (अध्यक्ष, शिवसेना-वेल्हा) भरत किन्हाळे (उप तालुका प्रमुख-राष्ट्रवादी) रामभाऊ मांढरे ((राष्ट्रशक्ती संघटना, भोर तालुका) गोरख मानकर (संघटक, कृती समिती) शुभम यादव ( समन्वयक, कृती समिती) अरविंद सोंडकर (सरचिटणीस, काॕंग्रेस) दादा पवार (किसान मोर्चा, भोर तालुका) दादा आंबवले, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button