महाराष्ट्र

स्वच्छता हीच सेवा – मुख्याध्यापक अमोल फुले

अकलूज प्रतिनिधी तात्यासाहेब काटकर

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना ‘स्वच्छता ही सेवा’ या विशेष अभियाना अंतर्गत अकलूज आगारामध्ये साफसफाई, काटेरी झुडपे तोडणे, प्लास्टिक कचरा व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. सदरील मोहिमेत विद्यालायाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५० विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापक अमोल फुले, उपप्राचार्य संजय शिंदे, अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम पार पडली.

या वेळी मुख्याध्यापक अमोल फुले यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य विद्यालयीन युवक करीत असतो अशी माहिती दिली.

आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी स्वच्छतेचे महत्व सांगून वेळेचे नियोजन कसे करावे हेही सांगितले. तर कार्यक्रम अधिकारी संग्रामसिंह भांगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे.

समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना आहे अशी माहिती दिली. सदरील मोहिमेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सहाने सहभाग घेऊन कामे केली व पुन्हा एकदा असे कार्यक्रम घेण्याची विनंती केली. या प्रसंगी वाहतूक निरीक्षक केतन सोनवलकर, वाहतूक नियंत्रक विजय रणदिवे, संतोष शिंदे, विजय लंगोटे, वरिष्ठ लिपिक उदय दुपडे, राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी संजय जाधव, उमेश भिंगे, अविनाश जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button