आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वाढदिवसानिमित्त महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरत्न वेलफेअर ट्रस्ट, महिला आर्थिक विकास महामंडळ व ग्रामपंचायत यशवंतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग केंद्राचे महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते पाटील व माजी सरपंच देवश्री सत्यशिलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी गीतांजली (दिदी ) जगताप, शिवरत्न वेलफेअर ट्रस्टच्या अध्यक्षा वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या प्राचार्या मृदुला जक्कल , माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई फुले, यशवंतनगर सरपंच- वर्षा सरतापे,माजी सरपंच लक्ष्मी डावरे, जिल्हा व्यवस्थापक PMFE समाधान खुपसे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भोसले, प्रशिक्षिका ललिता महाजन, हेमा माने,

माळशिरस तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे, सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र व्यवस्थापिका तनुजा पाटील, वैशाली शिंदे , गौरी माने देशमुख, मनीषा गवळी, अश्विनी गिरमे, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार नवले, ग्रामपंचायत कर्मचारी व महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



