शहर

डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील वडकुन येथील 30 वर्षीय विनीत चौधरी यांची हत्या.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील वडकुन येथील एका 30 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे.याबाबत डहाणू पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

डहाणू वडकुन चिंचणीपाडा गल्ली येथील विनीत हेमंत चौधरी वय वर्ष 30 हा युवक गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9 वाजता आपल्या राहत्या घरातून त्याच्या मोटरसायकल वरून बाहेर गेला होता. तो परतलाच नाही म्हणून त्यांच्या वडिलांनी डहाणू पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. अखेर या युवकाचा 8 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह डहाणू येथील डम्पिंग ग्राउंड माणिक मेटल कंपनी पांचाळ हॉलच्या पुढे डहाणू पोलिसांच्या हाती गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता सापडला आहे. यावेळी त्याच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल सापडला नसून त्याची मोटर सायकल घटनास्थळावरून डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
विनीत चौधरी यांची हत्या करण्यात आली आहे असा वैद्यकीय अहवाल डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी पोस्टमार्टम करून डहाणू पोलिसांना दिला आहे.
या गुन्ह्याबाबत अधिक तपास डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button