भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान बार्शी शहर व तालुका प्रभारी पदी प्रशांत ताटे देशमुख यांची निवड

प्रतिनीधी… रियाज मुलाणी
मो 9921500780
प्रशांतभाऊ ताटे देशमुख उपाध्यक्ष भारतीय जनता माळशिरस तालुका यांची सदस्य नोंदणी अभियान बार्शी शहर व तालुका प्रभारी पदी निवड झाल्यामुळे त्यांनी तात्काळ बार्शी तालुक्यातील वैराग येथे शिवराज पुकळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान संदर्भात बैठका घेऊन रेफरल कोड काढणे ऑनलाईन नोंदणी करणे याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

यावेळी वैराग व परिसरातील युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती वैराग येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले व नोंदणीस सुरुवात झाली यावेळी राळेरास हत्तीज मुंगशी वैराग शहर ग्रामीण या ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उदय क्षीरसागर पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




