इंदापूर तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी १९ कोटींचा निधी मंजूर – माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
“ए तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी”

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147
इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणा-या सहा रस्त्यांसाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल १९ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच सदरील रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे “ए तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी” असल्याचे माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जांब – उध्दट – मानकरवाडी – कर्दनवाडी रस्ता (लांबी ८०० कि.मी) – रक्कम रू ५.७९ कोटी व बावडा- शेटफळ हवेली रस्ता (लांबी ६ | ६००कि.मी) – रक्कम रू५.३३ कोटी या दोन कामांना जवळपास ११ कोटी १२ लक्ष इतका निधी प्राप्त झाला असून या कामांची निविदा प्रक्रियाही चालू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा- २ जिल्हा वार्षिक योजनेमधून सुद्धा आपल्या तालुक्यासाठी चार रस्ते मंजूर झाले असून यामध्ये प्रजिमा- ६५ न्हावी ते काळोखे वस्ती – मारकड वस्ती ते लोणी देवकर औद्योगिक वसाहत रस्ता.ग्रा.मा. ९ (लांबी २४५० कि.मी) – रक्कम २ कोटी ८ हजार रू, रा. म. ९६५जी ते कारंडेमळा निमसाखर रस्ता (लांबी २४७० कि.मी.) – रक्कम १.४६ कोट, प्रजिमा १७० बोरी ते खंडोबा मंदिर-जोरी वस्ती हनुमान वस्ती ते काझड रस्ता (लांबी २ | ४०० कि.मी) – रक्कम रू२.१७कोटी आणि रा.म.९६५ जी ते तरंगवाडी ते बुनगेवस्ती, आंबेमळा रस्ता (लांबी ३ ७३० किमी) – रक्कम रू २.६६ कोटी अशा प्रकारे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास ११.५५ किमीचे रस्ते मार्गी लागणार असून या कामांसाठी एकूण ८ कोटी २९ लक्ष ८ हजार इतका निधी मिळाला असल्याचे श्री भरणे यांनी सांगितले.
दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, रस्त्यांच्या कामांच्या बाबतीमध्ये त्या-त्या भागातील नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे तालुक्याचा आमदार या नात्याने वरील कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून १९.४१ कोटींचा निधी मंजूर करून आणले आहेत. सदर रस्ते झाल्यानंतर या भागातील दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटून रस्त्यांचा अनुशेष तर भरून निघणार आहेच परंतु नागरिकांची रस्त्यांअभावी होणारी गैरसोयही टळणार असल्याचे निश्चितपणे समाधान आहे.




