महाराष्ट्र

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलूज , येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील अंतिम वर्ष पदवी कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि . २७/०६/२०२३ रोजी हॉटेल चेहिता रिसॉर्ट , संग्रामनगर , अकलूज येथे संपन्न झाला. निरोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालय , माळेवाडी , अकलूजचे माजी प्राचार्य डॉ . आबासाहेब देशमुख हे लाभले . कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, कार्यालयीन अधिक्षक . शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

निरोपसमारंभाची सुरूवात सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील ( काकासाहेब ) व रत्नप्रभादेवी मोहिते – पाटील ( अक्कासाहेब ) यांच्या प्रतिमापुजनाने झाली . त्यानंतर डॉ . आबासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले . त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहिले पाहिजे . मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो . विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगामध्ये जिद्द , चिकाटी , दृढ निश्चय ठेवून उतरले पाहिजे असे सांगीतले .

यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच विद्यार्थी सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला.

काॅम्प्युटर पदवी अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चि . अमसिद्ध बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन कु . श्रावणी बाबर हिने केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा कु . दिया रणवरे व सर्व सदस्य यांनी विशेष परीश्रम घेतले.

प्राचार्य
सहकार महर्षि शंकररराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button