महाराष्ट्र

अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टने वाचनालयाला दिली पुस्तकांची भेट

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

भोर येथील श्रीमंत गंगुताई पंतसचिव वाचनालयात संगमनेर येथील अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या वर्धापन दिनानिमित्त ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या
अध्यक्षा उल्का बांदल यांनी वाचनालयाचे ग्रंथपाल दिलीप निगडे, वाचनालयाचे उपकार्याध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या कडे स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असणारी पुस्तके, कथा, कांदबरी,कृषी विषयक पुस्तके तसेच विनोदी पुस्तके अशी १५ हजार रुपये किंमतीची ५१ पुस्तके भेट देण्यात आली.

ट्रस्टच्या अध्यक्षा उल्का बांदल यांनी वर्षभरात घेतलेल्या कृषी विषयक व्याखाने, गांडूळ खत प्रकल्प, सेंद्रिय शेती केल्याने होणारे फायदे या विषयी माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. विठ्ठल शिंदे, प्रल्हाद बांदल यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या प्रसंगी लालासाहेब बांदल,वंदना देशमुख,अर्पणा जगताप,उल्का बांदल, प्रल्हाद बांदल, विठ्ठल शिंदे, दिलीप निगडे, बाळासाहेब देशमाने,स्वराजंली टोणपे, रमेश कोठावळे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button