प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून लाथा बुक्क्यांनी व काठ्यानी मारहाण बारामती पोलीस स्टेशन कडून अकलूज पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
संगम तालुका माळशिरस येथील फिर्यादी सरस्वती महादेव रत्नपारखी यांचा मुलगा कृष्णा महादेव रत्नपारखी यांनी आरोपी दीपक कृष्णा लावंड यांची मुलगी निकिता दीपक लावंड याच्याशी 15 दिवसांपूर्वी प्रेम विवाह केला चा राग मनात धरून संगम तालुका माळशिरस येथे फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी काट्याने व दगडानी मारहाण केल्याची फिर्याद बारामती शहर पोलीस स्टेशन( पुणे ग्रामीण) कडे हा गुन्हा दाखल झाला असुन तो अकलूज पोलीस स्टेशन कडे वर्ग झाल्याने
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दि-05/03/2023 रोजी सायंकाळी 06/00 वा.चे सुमारास यातील फिर्यादी ही घरात असताना मुलगी नामे निकीता दिपक लावंड वय-19 वर्षे हिने 15 दिवसापुर्वी फिर्यादीचा मुलगा कृष्णा महादेव रत्नपारखी वय-22 वर्षे याचेशी प्रेमविवाह केलेचा राग मनात धरुन माझे घरात फिर्यादी एकटीच असताना आरोपीत म।। याने घरात घुसुन बेकायदेशिर जमाव जमवुन फिर्यादीस हाताने लाथाबुक्यांनी ,लाठाकाठ्यांनी,दगडांनी मला किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभुत होवुन घरातील साहित्याची व घराची तोडफोड करुन नुकसान केले आहे.

म्हणुन माझी 1) दिपक कृष्णा लावंड 2)सौ निलम दिपक लावंड 3) सौ सुमन कृष्णा लावंड 4)सौ रेणुका अनिल लावंड 5) अनिल कृष्णा लावंड 6)रंजना सिध्देश्वर लावंड 7)स्वप्नाली अमोल माने 8) यशवंत मोहन माने 9) सानिका यशवंत माने 10) नवनाथ मोहन माने 11) आकाश उर्फे अक्षय अनिल लावंड 12) कोमल अनिल लावंड 13) मोहन रघुनाथ माने 14) विमल मोहन माने 15)रोहिदास सिध्देश्वर लावंड सर्व रा-संगम ता माळशिरस यांचेविरुध्द कायदेशिर तक्रार आहे. म्हणुन वगैरे मजकूरची फिर्याद बारामती शहर पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) येथुन दवाखाना एंन्ट्री अंमलदार पोहेकॉ/733 वणवे यांनी जबाब घेवुन तो टपालाने प्राप्त झाल्याने अकलुज पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे आदेशान्वये तो भाग 5 रजि. दाखल करुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मे हु।।.कोर्टात पाठवून पुढील तपास वरिष्ठांचे आदेशानुसार पोना/1829 जाधव यांचेकडे दिला आहे म्हणून नोंद . याबाबत वरील सर्व आरोपीच्या विरोधात अकलूज पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 154 एप्रिल 2023 भारतीय दंड विधान संविधान कलम 452 324 323 504 506 427 143 147 149 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
दाखल अमलदार- पोलीस हेडकॉन्स्टेबल/334 बोराटे याबाबत अधिक तपास
पोलीस नाईक/1829 जाधव करत आहेत मो .9881481829



