माळखांबी येथे जि प प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
माळखांबी येथे प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच मंगलाताई पुजारी या होत्या.
या दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी वेशभूषा परिधान करून राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,रमाबाई,पी टी उषा,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु,डॉक्टर,शिक्षिका यांच्या भूमिका साकारल्या ,तर काही विद्यार्थिनींनी भाषणे व नृत्यगीते सादर केली.उपस्थित सर्व महिलांना पुष्पहार देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमावेळी माळखांबीची कन्या .अपर्णा दत्तात्रय सपकाळ हिने एस एन डी टी मुंबई विद्यापीठामध्ये अँँनालायटीक केमिस्ट्री या विषयातुन सर्व प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिला समस्त महिलांकडून सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा धनश्री गमे पाटील,सीमा गमे पाटील,ज्योती सरतापे,लक्ष्मी सरतापे,कोमल साठे,हेमलता जावीर,अंबिका जावीर, राणी गमे,राणी शिंदे,रोहिणी गमे पाटील,उज्वला खंडागळे, प्रज्ञा सरतापे, महानंदा सावंत,संगीता पवार,गायबाई सरतापे,सुजाता सरतापे आदी महिला उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक क्षीरसागर सर,लोखंडे सर,पाटील सर,कांबळे सर,कळसाईत सर,जायभाय सर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सुनीता पवार मॅडम यांनी मानले.



