शहर

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

उपसंपादक—–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महिलांना समाजात समान दर्जा मिळावा, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, समाजात पसरलेली विषमता दूर करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्नशील राहावे या उद्देशाने जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

शाश्वत उद्यासाठी आज लिंग समानता’
ही थीम घेऊन आणि महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करत शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील शिक्षिका शिल्पा नारायणकर होत्या . त्यांच्या हस्ते फोटो पूजन संपन्न झाले.
स्त्रियांच्या पंखाखाली अवघे विश्व वसलेले असते एक दिवस का होईना स्वतःच्या अस्तित्वासाठी महिला दिन साजरा केला पाहिजे आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील महिला शिक्षिकांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त भाषणे केली मुलांच्या भाषणानंतर प्रशालेतील शिक्षिका . अनुष्का बर्गे यांनी भाषण केले. या प्रसंगी विज्ञान दिनानिमित्त झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण करण्यात आले. तदनंतर इयत्ता सहावीतील मुलींनी बॉलीवूड डान्स सादर केला तर इयत्ता चौथीतील मुलींनी थीम डान्स सादर केला. तर प्रशालेतील शिक्षिका .शिल्पा जाधव यांनी मनोरंजनपर ‘वेड मोबाईलचं’ या विषयावर नाटक सादर केले.


या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त तयार केलेल्या पोस्टर्सचे अनावरण मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्त्री ही क्षणाक्षणांची साथीदार असते तिच्या अस्तित्वापुढे हे जग अधुरे आहे’ अशा भावना व्यक्त करत प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख यांनी महिलांविषयी आदर व्यक्त केला. आणि अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी .तेजश्री काळे आणि .ईशिका शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता आठवीतील मनस्वी राजपुरोहित हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button