मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो – निताताई सुळे

टाइम्स 9 मराठी न्युज
माळशिरस तालुक्यातील अकलूज, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सर्व माता-भगिनींना राजगिरा लाडू वाटप व गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

स्त्री ही अबला नसून सबला आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे सामर्थ्यवान स्त्रीचा हात असतो हे उदाहरण दाखल आपण जाणून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये माता जिजाऊ चा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये रमाई चा वाटा आहे. तसेच आपल्या शाळा आणि कॉलेजमधील मुलामुलींना घडवण्यामध्ये सुद्धा तुमच्या आईचा महत्त्वाचा वाटा आहे हे नाकारून जमणार नाही. संस्कार,जिद्द, चिकाटी, समानतेची वागणूक, बंधुभाव आणि न्याय या गोष्टीचा अवलंब केल्यास निश्चित पणाने भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.

या कार्यक्रमाला मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महेश शिंदे जिल्हा महिला अध्यक्ष नीताताई सुळे, तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत धनवडे माळशिरस तालुका कार्यकारणी सदस्य प्रकाश सोनवणे व सौ. सोनवणे ताई, वर्धमान सुराडे व मंगेश बुराडे आदी उपस्थित होते.



