लाखेवाडी येथील कॉलेज ऑफ फार्मसीत आंतरशालेय क्रीडा स्पर्धा “एनर्जिया २०२३ ” उत्साहात संपन्न.
बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबा. 8378076123
लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धा “एनर्जिया २०२३ ” चे आयोजन २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान करण्यात आले होते.
स्पर्धेतील व्हॉलीबॉलमध्ये तिसऱ्या वर्षांतील मुलांच्या संघाने बाजी मारली. थ्रोबाॅलमध्ये अंतीम वर्षाच्या मुलींनी बाजी मारली. क्रिकेटमध्ये अंतीम वर्षांच्या मुलांनी तर प्रथम वर्षाच्या मुलींनी संघर्ष करत विजय संपादन केला. मुलींच्या रस्सीखेचमध्ये प्रथम वर्षाने तर मुलांच्या अंतीम वर्षांनि बाजी मारली. तर थाळीफेकमध्ये व्दितीय वर्षाच्या अक्षय बिटाळे यांनी तर मुलींच्या अंतीम वर्षाच्या वैष्णवी ढोले यांनी विजय मिळवला. गोळाफेक मध्ये मुलींच्या अंतीम वर्षाच्या चैत्राली सानप यांनी विजय संपादन केला. शंभर मिटर रनिंगमध्ये प्रथम वर्षांच्या संचितने विजय संपादन केला. चारशे मिटर रिलेमध्ये व्दितीय वर्षांच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी यश खेचून आणले. तर अंतीम वर्षाच्या मुलींनी विजय संपादन केला.
दरम्यान, स्पर्धेचा प्रारंभ ट्रॉफीचे लोकार्पण जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रलेखा श्रीमंत ढोले यांच्या हस्ते करून करण्यात आला. “एनर्जिया २०२३ मध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, थ्रो बॉल, रस्सीखेच, गोळाफेक, थाळीफेक, धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. डी व बी फार्मसी कॉलेजच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलांच्या पाच व मुलींच्या पाच संघांनी सहभाग घेतला. बाद फेरीनुसार जोड्या लावत अंतिम विजेता संघ निवडण्यात आला. पंच म्हणून स्वप्नील नाझरकर सर, वैभव भागवत सर, नितीन माळी सर, उनकीत गोसावी यांनी काम पाहिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य सम्राट खेडेकर, अधीक्षक गणेश पवार, अमोल बन, राजेंद्र खराडे, रचना दास, फरीदा शेख आदीसह मान्यवर उपस्थित होते.