अकलूज पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज पदी पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांची नियुक्ती
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शिरीष कुमार सरदेशपांडे यांच्या आदेशान्वे माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांची अकलूज पोलीस ठाणे येथे इन्चार्ज पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उस्मानाबाद भूम तालुक्यातील गायकवाड या सुसंस्कृत संस्कारी कुटुंबात जन्माला आलेले दीप रतन गायकवाड यांची 2005 रोजी महाराष्ट्र पोलीस खात्यात नियुक्ती झाली आणि 2006 ते 2010 या कालावधीत दीपरतन गोरख गायकवाड यांनी मुंबई पोलीस दलात दमदार कामगिरी बजावली यानंतर 2010 ते 2013 या कालावधीत गडचिरोली येथे पोलीस निरीक्षक पदाची भूमिका बजावली
तर 2013 ते 2017 लातूर पोलीस ठाणे येथे आपल्या पोलीस कर्तव्याची जबाबदारी पार पाडून 2017 ते 2020 पर्यंत सोलापूर पोलीस ठाण्यात दमदार कामगिरी बजावली यानंतर 2022 या कालावधीत माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस आणून स्थानिक गुन्हेगारांना जेरबंद करून या भागातील गुन्हेगारी संपुष्टात आणून माळशिरस या भागात अनेक विधायक कामे केली आहेत.
त्यांच्या या सर्व दमदार कामगिरीची दखल घेऊन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. शिरीष कुमार सरदेशपांडे यांनी पोलीस निरीक्षक दीपरतन गोरख गायकवाड यांची नियुक्ती 2 मार्च 2023 पासून अकलूज पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज पदी केली आहे.
दीपरतन गायकवाड यांचे लहान बंधू पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यासह विधायक कामे करून पोलीस दलासाठी दमदार कामगिरी बजावत आहेत. म्हणून पालघर जिल्ह्यातील युवा तरुणांनी पोलीस निरीक्षक दीपरतन गोरख गायकवाड यांचे लहान बंधू पालघर जिल्हा केळवा सागरी पोलीस ठाणे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गोरख गायकवाड यांना सिंघम पदाची पदवी बहाल केली आहे.