डॉ.देवरुपी माणसाला पत्रकारांच्या आरोग्याची काळजी
डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी केले पत्रकारांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन
टाइम्स 9 मराठी न्युज
अकलूज: अखंड आयुष्य अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रावर आधीराज्य गाजवणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व वर्ल्ड किडनी डे निमित्त अकलूज परिसरातील सर्व पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत किडनी तपासणी शिबिराचे आयोजन ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता डॉ. देवडीकर हॉस्पिटल मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी दिली.
सुख संसाराचा त्याग करून समाजाच्या हितासाठी, त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी आहोरात्र कष्ट घेणारे पत्रकार बांधव यांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे.वेगवान आयुष्यात आणि धकाधकीच्या वातावरणात बातमीसाठी सदैव तत्पर राहणे ,जाहिरात मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष तर जाहिरात मध्ये आढळणाऱ्या तफावत व विषमतेला तोंड देत आहोरात्र बातमीला चालना देऊन माणुसकीच्या शत्रू संगे लढणारी लेखणी झुंजार अशीच असते.काही पत्रकार सोडले तर काहींच्या आयुष्यात ओढाळलेले आर्थिक आरिष्ट हे परिस्थिती आणि मनस्थिती खालावत आहे. यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय पर्याय जरी राहत नसला तरी डॉक्टर देव माणसाच्या नजरेतून या गोष्टी सुटत नाहीत.
अतुट आत्मविश्वासाच्या बळावर किडनी विकाराने ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या रुग्णांना यमसदनातून सुखरूप घरी पोहचवून वैद्यकीय क्षेत्रात अफाट आविष्कार घडवणारे अकलूज येथील डॉ. श्रीकांत देवडीकर हे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे दिसत आहे.डॉ. देवडीकर यांचे कोरोना काळातील काम अविस्मरणीय आहेच परंतु किडनीचे विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना नवे जीवन देण्याचे महान कार्य त्यांनी करून दाखविले आहेत व दाखवत आहेत.
याचमुळे त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा उमटला आहे. पैसा मिळविण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी झगडणारा देव रुपी डॉक्टर म्हणून श्रीकांत देवडीकर यांचेकडे पाहिले जाते.कारण त्यांच्या नावातच श्रीदेव दडला आहे.ते राबवत आसलेल्या प्रत्येक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.