पिंपरी बुद्रुक येथील भिमा नदीत पात्रात सिल्व्हर जातीचा ३० किलोचा मासा सापडला. लिलावात किलोला १८० रुपये दराने विक्री.
बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123
पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथील मच्छिमार कृष्णा बाळासाहेब रजपूत याला भीमा नदी पात्रात मासेमारी करताना तब्बल ३० किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा सापडला आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मासळी बाजारात या माशाची तेजश्री फिश मार्केट मध्ये दत्तात्रय व्यवहारे यांच्याकडे उघड लिलाव पध्दतीने विक्री करण्यात आली. त्यांची १८० रुपये किलो दराने विक्री झाली असून साडेपाच हजार रुपये उत्पन्न यातून त्याला मिळाले आहे.
पिंपरी बुद्रुक येथील कृष्णा बाळासाहेब रजपूत हा गेली पाच ते सात वर्षांपासून मच्छीमारीचा व्यवसाय करतो. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी तो मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यासाठी गेला होता, त्याने जाळे देखील टाकले. सोमवारी त्या जाळ्यात त्याला तब्बल ३० किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा मिळून आला. मासेमारी करत असल्यापासून पहिल्यांदाच एवढा मोठा मासा मिळाल्याचे त्याने सांगितले.