सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला सकाळी “प्रतापगड”धवलनगर या निवासस्थानी त्यांच्या धर्मपत्नी सौ.उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी व मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी ओवाळले यावेळी इलाक्षीराजे मोहिते पाटील,निहानसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
यानंतर ग्रामदैवत श्री.अकलाई देवीचे दर्शन घेऊन अकलूज येथील गोळीबार चौक येथे सकाळी अकरा वाजल्यापासून लोकांचा सत्कार स्वीकारला यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरासह सोलापूर जिल्ह्यातील हजारो लोकांनी त्यांचा सत्कार केला. वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम घेण्यात आले दक्षिण सोलापूर,मंगळवेढा पंढरपू, सांगोला,माळशिरस जिल्ह्यातील यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अनेक गावांमध्ये रक्तदान शिबीर, वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप, क्रिकेट स्पर्धा,कराटे स्पर्धा, अन्नदान यासह अनेक उपक्रम राबवण्यात आले
त्यामध्येअकलूज येथे माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी व अकलूज शहर काँग्रेस कमिटी. यांचे वतीने तालुका अध्यक्ष सतिश पालकर, शहराध्यक्ष नवनाथ साठे, तालुका युवक उपाध्यक्ष मयुर माने यांचे वतीने निकाली कुस्तीचे भव्य असे जंगी मैदान घेण्यात आले. यामध्ये शंभर रुपयापासून रुपये तीन लाख 51 हजार पर्यंतच्या सुमारे 500 कुस्त्या लावण्यात आल्या महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यामध्ये झालेल्या अंतिम परिस्थितीत माऊली कोकाटे यांनी सदगीर यास चितपट करुन रुपये तीन लाख 51 हजार चे बक्षीस मिळवले सुमारे दहा हजार लोकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात नियोजनबद्ध असे मैदान पार पडले.
पुरंदावडे, सदाशिव नगर या.माळशिरस येथे दादासाहेब जाधव व गुलाबराव निंबाळकर यांचे वतीने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना माळशिरस तालुका व काँग्रेस कमिटी चे वतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते पाच हजार पासून सुमारे एक लाख अकरा हजार पर्यंतचे बक्षीस असे मध्ये ठेवण्यात आली होती,
यामध्ये सुमारे 300 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. दक्षिण सोलापूर या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली.अकलूज येथे भारतातील सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान राजा यांचे कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला मोठ्या उत्साहात झाला. अकलूज व परिसरातील हजारो नागरिकांच्या या कार्यक्रमास उपस्थित होते.