डाॕ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कव्वालीचा कार्यक्रम संपन्न.

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी आणि मुस्लिम जमात माळशिरस तालुका यांच्यावतीने सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा अकलूज येथील विजय चौकात शानदार कव्वाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातील नेते पदाधिकारी शुभचिंतक कार्यकर्ते अशा हजारोच्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला

याप्रसंगी जुल्कर शेख , फिरोज देशमुख, जावेद बागवान , मौलाना तय्यबअली, अफसर बागवान , आयुब कुरेशी , इब्राहिम मुलाणी , हुसेन शेख , इस्लाम पटेल, जुनैद बागवान , जाकीर शेख , मोहसीन बागवान, जावेद बागवान , इम्रान मोहोळकर, मोहम्मदआरिफ शेख , ताहेर मोहोळकर यांच्यासह अनेक मुस्लिम समाजातील कार्यकर्ते , हजारो नागरीक महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते .



