महाराष्ट्र

बनावट बिनशेती कागदपत्रे तयार करून घरे उभारणाऱ्या जागा मालकासह दोन बांधकाम व्यवसायिकांवर वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी केले गुन्हे दाखल

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत..

डहाणू तालुक्यातील वाणगाव हद्दीत विकत घेतलेल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारतीचे बांधकाम करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी वाणगाव पोलीस ठाण्यात जागा मालकासह दोन बांधकाम व्यवसायकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

बोईसर येथील एका ग्राहकाने वाणगाव येथील गट क्रमांक 91 मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये घर खरेदी केले आहे. परंतु ही जागा बनावट कागदपत्रे तयार करून ही घरे विकण्यात येत आहेत हे ग्राहकाच्या लक्षात आल्यावर या ग्राहकाने त्वरित पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती या तक्रारीची डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या आदेशाने वाणगाव मंडल अधिकारी राजेश निमगुळकर यांनी अधिक चौकशी केली असता सातबारा उताऱ्यावर बिनशेती आदेश बनावट असल्याचे निष्पन्न झाले

यावरून बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या जागा मालक धीरेंद्र ठाकूर आणि ही जागा विकसित करून अनधिकृत पणे घरे उभारून ती विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसाय शशिकांत खंडलवाल व विजय गुप्ता या तिघां विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून हे तिन्ही आरोपी फरार आहेत याबाबत अधिक तपास वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button