अकलूज येथील मदरसा बज्मे अन्वारे सोफिया मधील विद्यार्थ्यांना हाफीज , कारी व आलिम -पदवी प्रदान.

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
दि. 01/03/2023रोजी अकलूज येथील मदरसा बज्मे अन्वरे सुफिया ,शाहाबुल उलुम मध्ये हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी रहेमतुल्ला आलै.व हजरत सुफी अब्दुल्ला इब्राहिम रहेमतुल्ला अलै. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मदरसा चे वतीने आयोजित करण्यात आलेल्या

शानदार अशा काँन्फ्रन्स व बक्षीस वितरण समारंभाला पीरसाहब अहमद रझा ( आरिफ बाबा ) व पि.एच.डी प्राप्त मौलाना डॉ. मुस्सब्बीर रझा यांच्या उपस्थितीत अत्यंत शानदार संपन्न झाला यात डॉ.मुस्सब्बीर रझा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या सोहळ्यात मदरसातील हाफीज पदवी प्राप्त केलेल्या १२,कारी पदवी प्राप्त केलेल्या ३ व आलिमियत पदवी प्राप्त केलेल्या ५आशा एकूण २० विद्यार्थ्यांना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली .या प्रसंगी माळशिरस तालुक्यातून सर्व मस्जिद चे मौलाना व परिसरातील असंख्य पुरुष व महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या.

त्यांच्या बसण्याची व जेवणाची सोय मदरसातर्फे करण्यात आली होती. याप्रसंगी अध्यक्ष हाजी चांदसाहब काझी. उपाध्यक्ष हाजी दादाभाई मोहोळकर. सचिव युसुफसाहब साहेबलाल शेख, सल्लागार ॲड.एम जी तांबोळी यांच्या वातीने चिरंजीव आबेदहुसेन महमूद तांबोळी उपस्थित होते, विश्वस्त हाजी जहांगीरभाई चौधरी,खजिनदार सलीम भाई खतीब प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व मुलांना पारितोषिक व बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा व माळशिरस तालूक्यातून मुस्लिम श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम अतिशय सुंदर व बहारदार रित्या संपन्न झाला… शेवटी मजसा बजने अनवारे सोफिया च्या ट्रस्टीच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले .



