क्राईम

अकलुज पोलिसांची मोठी कारवाई: चोरी झालेली ‘इको’ कार २४ तासांत हस्तगत, वाघोलीतील आरोपी गजाआड

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network

​अकलुज: अकलुज येथील पाटीदार मंगल कार्यालयासमोरून चोरीला गेलेली ‘इको’ कार शोधण्यात अकलुज पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा छडा लावून पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

​बागेचीवाडी (ता. माळशिरस) येथील रहिवासी असलेले फिर्यादी दिलीपशिंग नरेंद्रशिंग राजपूत (वय ४६, व्यवसाय आचारी) यांची ‘मारुती सुझुकी इको’ कार (क्र. MH 45 AQ 8970) ही दि. १ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अकलुज येथील बायपास रोडवर असलेल्या पाटीदार मंगल कार्यालयाबाहेरून अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. याप्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२१/२०२६ नुसार बी.एन.एस.कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता संशयित आरोपीची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश रामभाऊ रोकडे (वय २७, रा. वाघोली, पुणे) याला चोरीच्या वाहनासह २४ तासांच्या आत अटक केली.

​ही यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुजचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

​या पथकात पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, विनोद साठे, पंडित गवळे, बबलू गाडे आणि सायबर सेलचे निक्स पवार यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button