नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता विठ्ठल पराडे लाच लुचपच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटक तर दुसरा आरोपी शाखा अभियंता देवरे फरार

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एका कॉन्ट्रॅक्टरचे बिल मंजूर करून देण्यासाठी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार करणाऱ्या उप अभियंत्याला नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी अटक करून त्याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार (कॉन्ट्रॅक्टर )नाशिक चांदवड येथील असून त्यांनी नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आपला फर्म नोंदणीकृत केली आहे.यामुळे त्यांना नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून 90 लाख रुपयांचे रस्त्यांचे नवीन डांबरीकरणाचे काम मिळाले होते.या 90 लाखापैकी त्यांना 41 लाख रुपये मिळाले असून उर्वरित थकीत रक्कम मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत असताना ही रक्कम मिळवून देण्यासाठी उपअभियंता विठ्ठल बालाजी पराडे यांनी 3 लाख रुपये आणि शाखा अभियंता कृष्णकांत जिभाऊ देवरे यांनी 2 लाख 76 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार (कॉन्ट्रॅक्टर ) यांनी या अधिकाऱ्यांची लेखी तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे केली होती.या तक्रारीची पडताळणी करून नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक भारत तांगडे( नाशिक परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 4.45 वाजता नाशिक जिल्हा परिषद कार्यालय येथे पंचा समक्ष उपअभियंता विठ्ठल पराडे यांना 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्यावर नाशिक भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यातील पळून गेलेला दुसरा फरार आरोपी शाखा अभियंता कृष्णकांत देवरे याचा भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस कसून शोध घेत आहेत.



