क्राईम

वसई कोर्टातील सरकारी वकीलाला 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

वसई कोर्टातील सरकारी वकिलाला 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी गुरुवारी दुपारी वसई कोर्टात रंगेहात अटक करून त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वसई कोर्टात रिटर्न ऑफ प्रॉपर्टी अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी अर्ज केला होता.हे काम करून देण्यासाठी सरकारी वकील भूपेश अजित पुरंदरे वय वर्ष (47)सह दिवाणी उच्च स्तर वसई (वर्ग 2) यांनी तक्रारदार यांच्या कडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी या सरकारी वकिलांची लेखी तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ठाणे विभागाने गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 12.30 वाजता सापळा रचून सरकारी वकील भूपेश पुरंदरे यांना तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष वसई न्यायालयातील तळ मजल्यावरील सरकारी अभियोक्ता कक्षात रंगेहात अटक करून त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची यशस्वी सापळा कारवाई शिवराज पाटील पोलीस अधीक्षक अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र, आणि अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button