महाराष्ट्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष डहाणू आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

डहाणू सागर नाका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे शिवजयंती उत्सव शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी साजरी करण्यात आली.

सदर प्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आरोग्य शिबिरामध्ये मोफत ईसीजी तपासणी,शुगर तपासणी’ डोळ्यांचे तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम घेण्यात आले .

या आरोग्य शिबिरामध्ये डहाणूतील गोरगरीब २७० लोकांनी सहभाग घेतला होता .त्यापैकी 220 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. हे शिबिर ढवळे हॉस्पिटल पालघर व एकता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने घेण्यात आले.
या शिवजयंती उत्सवाला डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र मच्छी,नगरसेवक वरून पारेख, नगरसेवक तन्मय बारी, प्रदीप चापेकर,मिलिंद मावळे, चंद्रकांत गोरखाना, रवींद्र फाटक तसेच डॉक्टर विश्वास वळवी व तलासरीचे उपजिल्हाप्रमुख कुलात, अजगर शेख तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी डहाणूतील 15 ज्येष्ठ शिवसैनिकांचा सालशिफल देऊन सत्कार करण्यात आला .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख तानाजी काकडे, तालुकाप्रमुख संजय पाटील शहरप्रमुख प्रदीप लिमये, विश्वास निकम तसेच महिला आघाडीच्या उज्वला डामसे ,सुचित्रा कोठारी, लावण्या शेट्टी यांनी विशेष सहकार्य केले . तर जयंत पाटील सर व लिदोर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान आयोजित केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button