शहर

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा.

लक्ष्मीकांत कुरुडकर अकलूज (प्रतिनिधी)

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील,राष्ट्रवादीचे शंकर देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे,माझी जि. प. सदस्य डॉ रामदास देशमुख अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीबाबत या नेत्यांच्या भूमिकेकडे तालुक्यातील सर्वांचेच लक्ष लागले होते परंतु माळशिरस येथे प्रकाश पाटील व त्यांच्या गटाची बैठक होऊन या गटाने सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनलच्या विरोधात लढणाऱ्या माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला

मागील आठवड्यात या नेत्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याने माळशिरस तालुक्यातील विरोधकांमधील दुही दिसून येत होती सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी केली होती असे चित्र तालुक्यात पहावयास मिळत होते .परंतु माळशिरस तालुक्यातील या पारंपारिक विरोधकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने माळशिरस तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या विरोधकांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा अभाव दिसून आला होता.

श्रीराम शिक्षण संस्थेवर झालेल्या बैठकीत माळशिरस तालुक्यातील नेतेमंडळीसह पूर्व भागातील मतदार, कार्यकर्ते, नेते ,उपस्थित होते. या बैठकीत येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते.त्यांच्या भूमिकेचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होतो याबाबत राजकीय विश्लेषकामधून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.परंतु आज झालेल्या माळशिरस येथे बैठकीत या नेत्यांनी सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरोधात लढणाऱ्या माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलला पाठिंबा जाहीर केल्याने माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे पारडे जड झाले असून माळशिरस तालुक्यात सत्ताधारी मोहिते पाटील गटाविरोधात प्रथमच मोहिते पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र आले असून बाजार समितीतील निवडणुकीत याचे परिणाम दिसतील असे अशे राजकीय विश्लेषकाकडून बोलले जात आहे.

माळशिरस येथे झालेल्या या बैठकीसाठी जेष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, प्रकाश पाटील, राजकुमार पाटील, के.के. पाटील डॉ. रामदास देशमुख. शंकर देशमुख, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माणिक वाघमोडे, आप्पासाहेब वाघमोडे,गौतम माने,युवराज झंजे, दत्ता मगर, आदी मान्यवर उपस्थित होते.

(माझ्या गतीमुळे दोषामुळे अथवा अहंम भावामुळे माझ्याकडून अनावधानाने अथवा जाणून -बुजून चुका चुका झाल्याने माझे सहकारी माझ्यापासून दुरावले होते परंतु गेल्या पाच वर्षात याचे अनेक चटके मलाही बसले याचबरोबर माझ्या विरोधकांनाही अनेक वेदना झाल्या माझ्या या चुकाबाबत मी दिलगिरी व्यक्तव्यक्त करत असून यापुढे सगळे एकोप्याने काम करू व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत जे काही निर्णय घ्यावयाचे आहेत ते तुम्ही घ्या मी फक्त आमदारकीसाठी इच्छुक आहे विधानसभेला मला मदत करा) उत्तम जानकर. राष्ट्रवादीचे नेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button