शिक्षक भारतीची राज्य कार्यकारणी बैठक नाशिक येथे संपन्न राज्यातील शाळांना मोफत वीज द्या – सोलापूरच्या वतीने मागणी.

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
शिक्षक आमदार मा. कपिल पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य शासनमान्य शिक्षक भारती संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी नाशिक येथे पार पडली. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, महासचिव व मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुभाष मोरे, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी प्रमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी, संघटनेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर चर्चा करण्यात आली.

सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी राज्यातील शाळांना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी केली. यानंतर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले. करमाळा तालुका अध्यक्ष व जिल्हा प्रवक्ता विजयकुमार गुंड यांनी सोलापूर जिल्ह्यातील संघटनेचा प्रचार व प्रसार याविषयी राज्य कार्यकारणीस माहिती दिली.

या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार, जिल्हा संघटक शरद पवार, जिल्हा संपर्कप्रमुख रणजित दडस,सोलापूर शहराध्यक्ष देवदत्त मेटकरी, शहर सचिव नितीन रुपनर, उपस्थित होते. संघटनेच्या कार्याचे भाजपा जिल्हा सचिव श्यामजी सिंधी, भाजपा जिल्हा सरचिटणीस किसन मोर्चा नरेंद्र सिंह ठाकुर यांनी करमाळा या ठिकाणी भेट झाल्यानंतर कौतुक केले व शिक्षण क्षेत्रातील पुढील कार्यास करमाळा तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.



