शहर

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका पडवळेना 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे बनावटीकरण शिर्षाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मंजूर सुनावण्यात आली आहे.

दि.२८/११/२०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार कार्यालयातील धनादेश क्र. ०६९२१८ यावर लेखा अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या बनावट सह्या असलेला रुपये १,११,६३,३१,८१०/- (एकशे अकरा कोटी त्र्येसष्ट लाख, एकतिस हजार, आठशे दहा रुपये मात्र) इतकी रक्कम नमुद असलेला धनादेश ओवी कंस्ट्रक्शन यांना डिमांड ड्राफ व्दारे रक्कम अदा करणेबाबतचा धनादेश हा स्टेट बैंक ऑफ इंडीया, शाखा जव्हार या बँकेत आरोपी यज्ञेश अंभिरे याने वटविण्यास जमा करुन सदरचा धनादेश न वटल्याने सदरहू धनादेश चटविण्यासाठी ओवी कंन्सस्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे यांनी प्रयत्न केल्याचे व सदरचा धनादेश सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडुन वितरीत न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार्यकारी अभियंता श्री. नितीन भोये यांनी यातील आरोपीत क्र. १) निलेश रमेश पडवळे, आरोपी क्र. २) यज्ञेश दिनकर अंभिरे यांनी आपसात संगणमत करुन शासनाची आर्थीक फसवणुक करुन आर्थिक फायदा करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे विरुध्द दिलेल्या फिर्यादीवरून जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.न. २८१/२०२५ भारतीय न्याय संहीता अधि, २०२३ चे कलम ३३६, ३३८, ३१८(१), ३१८(४), ३(५) ६१ (२), ३०५, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ प्रमाणे दि.२८/११/२०२५ रोजी २३.११ वाजता गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपी क्र.१ निलेश रमेश पडवळे व आरोपीत क्र.२ यज्ञेश दिनकर अंभिरे यांना दि.२९. नोव्हेंबर .२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची ०६ दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली होती. त्यानंतर आरोपीची वाढीव पोलीस कोठडी मंजूर न झाल्याने आरोपी प्रथम न्यायालयीन कोठडीमध्ये व नंतर जामिनावर मुक्त झाले. नमुद गुन्हयाचा तपास बाकी असल्याने आरोपी पोलीस कोठडीत असणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने आरोपीची पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून प्रथम मा. अपर जिल्हा व सत्र न्यायालय, भिवंडी येथे रिव्हिजन अपील दाखल केले होते. ते मा. न्यायालयाने मान्य करुन आरोपीतांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले. परंतु आरोपीतांनी या आदेशाविरुध्द मा.उच्च न्यायालयात अपील केले.

सदर अपीलाची दि.२२/१२/२०२५ रोजी सुनावणी होवुन मा. उच्च न्यायालयाने मा. अपर जिल्हा सत्र न्यायालय, भिवंडी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आरोपीतांना दि.२४/१२/२०२५ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जव्हार यांचे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आरोपी क्र. १ निलेश रमेश पडवळे व आरोपी क्र.२ यज्ञेश दिनकर अंभिरे हे मा. प्रथमवर्ग न्यायालय, जव्हार येथे हजर झाल्यानंतर पोलीसांनी आरोपी यांची पोलीस कोठडी मिळणेबाबत विनंती केल्याने मा. न्यायालयाने आरोपीत यांची दि.२९/ डिसेंबर/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास पोनि/ शिरीष पवार,आर्थिक गुन्हे शाखा, पालघर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button