शहर

केळवा बीच या सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा करणाऱ्या दोन आरोपींना पालघर कोर्टाने सुनावली शिक्षा

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

दारूचे सेवन करून दारूच्या नशेत केळवा बीच या सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करून पर्यटकांना नाहक त्रास देऊन खाक्या वर्दीतल्या पोलीस महिला शिपाई आणि महिला अधिकारी यांना दातांनी दुखापत करून मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना श्रीमती ए.आर. रहाणे अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय पालघर वर्ग दोन यांनी दहा हजार रुपयांचा दंड व शिक्षा मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सुनावली आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील केळवा बीच या सार्वजनिक ठिकाणी 16 डिसेंबर 2017 रोजी रवींद्र ठाकूर राहणार आझाद नगर ठाणे, व विजेता रामचंद्र देवपा राहणार कल्याण हे दोन आरोपी हजारो पर्यटकांच्या समोर दारू पिऊन दारूच्या नशेत आरडा ओरड करत होते. याविषयी तक्रार आल्यावर त्यांना समज देण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस शिपाई स्वाती गुंजाळ त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आल्यावर आरोपी महिला विजेता देवपा हिने महिला पोलीस शिपाई स्वाती गुंजाळ आणि या पोलिस ठाण्याच्या महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभोये यांना नखांनी दुखापत करून त्यांच्या हाताच्या बोटाला मारहाण करून बोट फॅक्चर करून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सरकारी कामात अडथला आणत होते. यावरून या दोघांविरुद्ध या पोलिसांनी दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या केसचा अंतिम निकाल मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सुनावण्यात आला असून सरकारी वकील अरुण मसराम, केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी आणि महिला कोर्ट पैरवी अधिकारी सारिका वैजनाथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावून सक्षम साक्षीदार कोर्टात सादर केल्यामुळे या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button