75 वर्षाची परंपरा जपत चाफेवाडी गावात जन्माष्टमी उत्साहात साजरी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सफाळे विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी गावात 75 वर्षाची परंपरा जपत या गावातील तरुणांनी जन्माष्टमी गोपाल काळा हा उत्सव शनिवारी थाटामाटात साजरा केला.
स्वातंत्र्य काळानंतर 1950 पासून विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी गावातील स्वर्गीय दीनानाथ पाटील यांच्या घरात संपूर्ण गावाच्या वतीने जन्माष्टमी हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येतो .
या सार्वजनिक उत्सवाला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.
या सन उत्सवाची परंपरा आजही या गावातील तरुण पिढी जपत असून श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री संपूर्ण जागरण करून श्रीकृष्णाची गाणी भजन गाऊन संपूर्ण रात्र जागरण केली जाते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाला म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी गावात लहान तसेच तरुण पिढी दहीहंडी फोडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात.



