स्टेट बँकेतील 111 कोटीचा घोटाळा करण्याचा प्रयत्न करणारा विक्रमगड माजी नगराध्यक्ष निलेश पडवळे (उर्फ पिंका) पालघर पोलिसांच्या जाळ्यात अटक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
बोगस चेक व बनावट सह्या करून जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी ) ठेकेदारांच्या नावे बँकेत जमा असलेली 111 कोटी 63 लाख रुपयांचा निधी लंपास करण्याचा प्रयत्न करणारा निलेश पडवळे (उर्फ पिंका) व त्याचा एका साथीदाराला पालघर पोलिसांनी शनिवारी ठाणे येथून अटक करून त्याच्या विरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निलेश पडवळे यांना जव्हार पोलिसांनी मुख्य आरोपी करून कोर्टात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.जव्हार येथील स्टेट बँकेच्या शाखेत 07 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांच्या खात्यात 069218 हा क्रमांक असलेला चेक जमा झाला होता. त्यावर 111 कोटी 63 लाख 31 हजार 810 रुपये रक्कम लिहलेली होती .

या रकमेबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांनी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी आमच्याकडून असा कोणताही चेक देण्यात आला नाही असा खुलासा दिल्यावर याबाबत अधिकाऱ्यांनी जव्हार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार
या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओवी कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि जिजाऊ संघटनेचे नेते तसेच विक्रमगड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष निलेश पडवळे (उर्फ पिंका) पडवळे आणि त्याच्या एका अन्य साथीदाराला पालघर पोलिसांनी शनिवारी अटक करून त्यांच्याविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर केले असता त्याला 04 डिसेंबर पर्यंत अशी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



