शहर

पालघर जिल्ह्या कासा पोलीस ठाणे हद्दीतील मेढवण खिंडीतील जंगलात सापडला माजी फुटबॉलपटूचा मृतदेह

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या मेढवण खिंडीतील जंगल परिसरात महामार्गापासून साधारण वीस मीटर अंतरावर 19 वर्ष वयोगटासाठी फुटबॉल खेळलेल्या मुंबईतील माजी फुटबॉलपटू सागर सोरटी वय वर्ष (35) याच्या मृतदेह आढळून आल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी कासा पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास कासा पोलिसांकडून सुरू आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सागर गेल्या दोन वर्षापासून मानसिक तणाव खाली होता 15 नोव्हेंबर रोजी पुणे येथे फुटबॉल खेळण्यास जात आहे असे सांगून घरातून बाहेर पडला होता मात्र त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मेढवण खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला आहे येत्या पंधरा दिवसानंतर त्याच्या धाकट्या भावाचे लग्न आहे लग्नासाठी त्याने नवीन कपडे शिवण्यास नकार दिल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती सापडली आहे.

सागरचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई करता येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली. कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून त्याच्या पुढील तपास कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button