चौदा वर्षांनंतर अकलूजच्या डी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी
अध्यापक विद्यालयातील आठवणींना उजाळा देत अकलूज येथील कै.सौ.अरुणादेवी देसाई अध्यापक विद्यालयातील २००७-२००९ या वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राध्यापक इंद्रजीत गायकवाड सर,देवानंद सोनटक्के सर विद्यार्थी शरद सावरे व दयानंद बोराटे यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.अध्यापक विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी शाळेत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.

तसेच काहीजण केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात पद भूषवित आहेत. याशिवाय अनेकांनी प्रगतशील शेतकरी म्हणून आपला ठसा उमटवला आहे.याशिवाय राजकारण, समाजकारण, व्यवसाय,उद्योग अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
चौदा ते पंधरा वर्षांनंतर एकत्र येत आयोजित केलेला स्नेहमेळाव्यास सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.जेष्ठ प्राध्यापक सिद्धू बनसोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रा.सचिन गोरे, प्रा.कोमल मिसाळ, प्रा.संजय जाधव, प्रा.श्रीमंत लांडगे व प्रा.उमेश गोडसे-पाटील यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांनी त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला.दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला .सर्व प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले की असे कार्यक्रम सतत घेतले जावेत कारण यामुळे आपणास एकमेकांची सुखदुःखें सांगता येतील,विचारपूस करता येईल व त्यामुळे ऋणानुबंध अधिक घट्ट होतील.आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात प्रामाणिक रहा असे सांगून सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.उपस्थित सर्व माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना त्यांचा चेहर समाधानी व आनंदी दिसत होता.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी सीमा लाटे,इम्रान मुलाणी, युवराज बनपट्टे,सुरज कांबळे,प्रदीप राजगुरू,जाविद मुलाणी व संदिप शिंदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप राजगुरू यांनी केले,सूत्रसंचालन अश्विनी निंबाळकर यांनी केले तर आभार संदिप शिंदे यांनी मानले.



