सोलापूर शहर – जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट चे जुबेरभाई बागवान यांनी नबीलाल बागवान यांना जाहीर केली आर्थिक मदत…

🎯 गोडाऊनला लागलेल्या आगीत झाले जवळ जवळ 22 लाख रुपयांचें नुकसान…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
दिनांक 19 मार्च दुपारी तीन वाजता विठ्ठल नगर,सोलापूर येथे तीन हजार स्क्वेअर फुट मध्ये वेस्टेज मटेरियलचा नबीलाल मेहबूब बागवान यांच्या मालकीचे गोडाऊन असलेल्या जागी आग लागल्याने तब्बल 22 लाख रुपये किंमतीचा माल जळून खाक झाला ही माहिती समजताच सोलापूर शहर- जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट ची टीम घटनास्थळी पोहोचली…
या वेळी नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितले की,बुधवारी दुपारी तीन च्या दरम्यान आठ महिला गोडाऊन मध्ये काम करत असताना अचानक आग लागली आणि गोडाऊन मध्ये असलेला सगळा वेस्टेज मटेरियल जळून खाक झाला…
या मुळे लाखो रुपयांचे नुकसान नबीलाल बागवान यांचें झाले असून सोलापूर शहर जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट कडून नबीलाल बागवान यांना 25 हजार रुपये रोख रक्कम ची “मदत” करण्यात आली…
नबीलाल बागवान यांचा याच धंद्यावर उदरनिर्वाह होता म्हणून आज सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट चे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी बागवान जमियतचे व्यापारी अडते व उद्योजक यांना आवाहन केले आहे की,रमजान महिन्यांमध्ये ही घटना अत्यंत धक्का देणारी आहे म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी…
या प्रसंगी जमियतचे उपाध्यक्ष अनवर बागवान,सेक्रेटरी हाजी इलियास बागवान,जॉईन सेक्रेटरी आबिद बागवान,शोएब चौधरी आरिफ मर्चंट आदी उपस्थित होते,आज दिवसभर सोलापूर येथे जुबेरभाई बागवान यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे…

ज्यांना नबीलाल बागवान यांना मदत करायची आहे अशा दानशूर लोकांसाठी आम्ही नबीलाल बागवान यांचा स्कॅनर सोबत पाठवलेला आहे ….



