महाराष्ट्र

रतनसिंह रजपूत यांना मोहितेपाटील एकनिष्ठ तेचे फळ

बी.टी.शिवशरण

श्रीपूर :रजपूत घराण्याचे श्रीपूर पंचक्रोशीत सामाजिक सांस्कृतिक विधायक काम आहे अनिलसिंह रजपूत यांनी लोकनेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीपूर मध्ये सर्वधार्मिय सामुदायिक विवाह सोहळा घेण्याची परंपरा सुरु केली त्याचे नियोजन आयोजन अतिशय सुरेख देखणे असायचे त्यातील शिष्टबधता सारेच मनात साठवण्याजोगे होते

गरिबांना सर्वसामाण्यांना सामुदाईक विवाह सोहळा त्यांच्यासाठी पर्वनी होती या सोहळ्याला मोहितेपाटील परिवार यांची उपस्थिती उल्लेखनीय असायची अनिलसिंह रजपूत यांनी विजय प्रताप युवा मंच च्या माध्यमातून या परिसरात सामाजिक विधायक सांस्कृतिक उपक्रम राबवले युवकांना संघटीत केले या माध्यमातून मोहितेपाटील यांचे विचार कार्य लोकांपर्यंत पोहचवले अनिलसिंह रजपूत यांचे अकाली दुःखद निधन झाले

त्यानंतर त्यांच्या पाठीमागे रतनसिंह अप्पा यांनी तोच वारसा मोहितेपाटील घराण्याशी एकनिष्ठ राहून त्यांची विचारधारा कार्य पुढे चालू ठेवले आणि त्याचेच फळ म्हणजे आज महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली अतिशय शांत निगर्वी स्वभावाचे रतन अप्पा हे सर्वसामान्यात लोकप्रिय आहेत सर्वधार्मिय लोकात अप्पा मिळून मिसळून असतात या परिसरातील समस्या प्रश्न विकासकामे याची त्यांना जाण आहे आणि ते सोडवतील या बद्दल सर्वांना निश्चित खात्री व अपेक्षा आहे त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button