तरुणांनो मेहनत करा आणि भविष्य घडवा.. तरुणांच्या सदैव पाठीशी उभा राहणारा सामाजिक कार्यकर्ता…कुणाल(दादा) पाटील

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे मांडे येथील कुणाल (दादा) पाटील ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार विद्यमान सदस्य तसेच जिल्हा विकास व नियंत्रण समिती पालघर अशा विविध पदावर कार्यरत असून पालघर जिल्ह्यात त्यांची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासाठी प्रोत्साहित करून आजच्या तरुणांनी उद्योगधंदे करावेत म्हणून पालघर जिल्ह्यातील तरुणांच्या सदैव पाठीशी उभा राहणारा निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज त्यांची पालघर जिल्ह्यात आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांचा पालघर जिल्ह्यातील वाढता जनसंपर्क, आणि सामाजिक कार्य या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांना आशीर्वाद दिल्यावर त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून सध्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आहे.

अखंड-भारत पुनर्स्थापनेचे चे पुरस्कर्ते आणि
”जय हिंदवी अखंड-भारत, जय हिंदवी महाराष्ट्र” हे ब्रीदवाक्य घेऊन त्या तत्त्वांनुसार जीवन जगणारे तरुणांना उद्योजगतेमध्ये पुढे जा मेहनत करा आणि भविष्य घडवा हे कायम मार्गदर्शन करणारे
इतर धर्मांचा सन्मान नक्कीच करू परंतु आपला हिंदू धर्म आणि आपली सनातन संस्कृती आणि आपले हिंदवी स्वराज्य जागृतपणे अभ्यासून जीवन जगा हे कायम सांगणारे
शिक्षणाच्या आरोग्याच्या खेळांच्या धर्माच्या आणि युवक घडणावळीच्या समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे आणि युवकांना त्यांच्या प्रखर आणि वास्तविक वाणीतून कायम मार्गदर्शन करणारे एक स्वतः विवेकपूर्ण, विचारशील, मुत्सद्दी उद्योजक कमी वयामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, गुजरात पर्यंत व्यवसाय करणारे.

आणि त्याचसोबत आपल्या मातृभूमी सफाळे परिसराला आणि पालघर जिल्ह्याला आणि इथल्या युवकांना आता भविष्यातील दिशा आणि भविष्याची दशा या दूरदृष्टीप्रति मार्गदर्शन करणारे आणि तशी चळवळ युवकांच्या मनात, हृदयात, स्वभावात आपल्या वाणीने पेरणारे…
त्यांचे विचार, त्यांच वकृत्त्व, त्यांच देशप्रेम, त्यांचं सनातनप्रेम हीच त्यांची ओळख क्रांतिकारी महर्षी योगी श्री अरविंद घोष ह्यांचे ते अनुयायी आहेत आणि त्यांच्याच साहित्यानुसार, विचारानुसार जीवन जगण्याचा प्रण त्यांनी केला आहे…
अशा हिंदूश्री कुणाल (दादा) पाटील यांच्या 13 नोव्हेंबर या वाढदिवसाच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील अनेक गावात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.
हिंदूश्री कुणाल (दादा) पाटील यांना टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क समुहाच्या वतीने वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा



