खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून भात गाडा चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न,अकलुज पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
खाजगी सावकारीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून एका भात गाडा चालकाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अकलुज शहरात घडली आहे.या प्रकरणी पीडित व्यक्तीने शुद्धीवर आल्यावर दिलेल्या जबाबा वरून अकलुज पोलीस ठाण्यात तब्बल 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2),351(3),352,324(4),3(5) सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39,45 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे…
गुन्हा दाखल: 09/11/2025 रोजी 01:52 वाजता ➡️ पोलीस ठाणे: अकलुज,ता.माळशिरस ➡️ गु.र.नं. व कलम: 730/2025 BNS कलम 351(2),351(3),352,324(4),3(5) महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39,45 प्रमाणे
सदरच्या गुन्ह्याची हकीकत
जुना बाजारतळ,अकलुज येथील रहिवासी असलेले मुनावर गुलमहंमद खान (वय 48) हे भात गाड्याचा व्यवसाय करतात.सन 2021 पासून ते 06/11/2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत आरोपींनी त्यांना वेळोवेळी त्रास दिला…
दिनांक 06/11/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता फिर्यादी घरी झोपले असताना,आरोपी सिद्धार्थ पवार हा त्यांच्या घरी आला आणि त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.सिद्धार्थ पवार याने फिर्यादीस आई-बहिणीवरून शिवीगाळी केली आणि मुद्दल व व्याजाचे पैसे एका तासामध्ये पाहिजेत,अन्यथा वाईट होईल अशी धमकी दिली.त्याने फिर्यादीच्या पत्नी व मुलांनाही शिवीगाळी करून त्यांच्या अंगावर धाव घेतली…
खाजगी सावकारांच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी मुनावर खान यांनी त्याच दिवशी दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास नवीन एस.टी. स्टँड समोर असलेल्या बागेत बुटेक्स नावाचे विषारी औषध प्राशन केले आणि तेथेच बेशुद्ध पडले.त्यांच्या ओळखीच्या लोकांनी त्यांच्या घरी माहिती दिल्यावर,मुलाने त्यांना तातडीने अकलुज येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.सध्या फिर्यादी यांच्यावर उपचार चालू असून ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत…
या त्रासाला जबाबदार धरून त्यांनी वरील 10 आरोपींविरुद्ध तक्रार दिली आहे.
आरोपींची नावे:
अनिल मदने (रा. महादेवनगर अकलुज)
सिद्धार्थ पवार (रा. अकलुज)
मनोज साळुंखे (रा. अकलुज)
भैय्या दत्तात्रय जगदाळे (रा. सराटी ता. इंदापूर जि. पुणे)
गुरु पवार (रा. लोणारगल्ली अकलुज)
सोनु मोहीते (रा. संग्रामनगर ता. माळशिरस)
गौरव माने (रा. मळोली ता. माळशिरस)
अवधुत शेंडगे (रा. वेळापूर ता. माळशिरस)
सचिन खिलारे (रा. अकलुज)
विलास मारकड (रा. खुडुस ता. माळशिरस)
गुन्ह्याचा तपास सपोनि लंगुटे सो हे करत आहेत.खाजगी सावकारीच्या जाचातून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने अकलुज शहरात एकच खळबळ उडाली आहे…



