शहर

सुवर्ण जयंती-मिशन वृक्षारोपण अंतर्गत छत्रपती शाहू विद्यानिकेतन शाळा,आयरे येथे वृक्ष लागवड

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर 

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क 

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था, जव्हार संचालित  “छत्रपती शाहू विद्यानिकेतन”, आयरे, ता. जव्हार येथे शनिवार दि. २०/०७/२०२४ रोजी हिंदुस्थान पेट्रोलियम रिफायनरी, मुंबई  (HPCL) यांच्यावतीने छत्रपती शाहू विद्यानिकेतन,आयरे शाळेत ऑल एचपीसीएल ओबीसी कर्मचारी संघटना- मुंबई रिफायनरी युनिट आयोजित स्वच्छता पखवाडा २०२४ च्या निमित्ताने सुवर्ण जयंती -मिशन वृक्षारोपणांचं कार्यक्रम करण्यात आला. या संस्थेचे पदाधिकारी यांचे आगमन होतच विद्यार्थ्यानी सर्व पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजरात व पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे लागवड  करण्यात आले. त्या झाडांना संस्थेतर्फे ट्री गार्ड सुध्दा देण्यात आले, तसेच संस्थेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रोपांची बियाणे  वाटप करण्यात आले.  त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक कापडी पिशवी, टूथपेस्ट, ब्रश,साबण याचे छानसे गिफ्ट देण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी  संस्थेचे डॉ. प्रफुल्ल विशे सर, श्री.केरकर सर , श्री. संजय भांगरे साहेब, श्री. नीरज पाल सर, सौ.डॉ.विशे (सावंत) मॅडम, कु.अद्विक विशे उपस्थित होते. या कार्यक्रमचे नियोजन छत्रपती शाहू विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रशांत रुकारी सर यांनी केले. श्री.भरसट सर यांनी  कार्यक्रमचे सूत्रसंचालन केले. तसेच श्री.भामरे सर, श्री. हाके सर, श्री.चव्हाण सर, श्री. पांडुरंग पगार, श्री.शशिकांत मगर, सर्व विध्यार्थी व कर्मचारी वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button