शहर

पालघर येथे पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न–महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा पुढाकार..

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हातर्फे आयोजित पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे उद्दिष्ट पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळावे हे होते.

हे शिबिर पालघर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड रेल्वे स्टेशनजवळ घेण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन देण्यासाठी पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. इंगवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पोलीस, मिलिटरी, नेव्ही किंवा कोणतीही शासकीय भरती असो त्यासाठी लक्ष्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच त्यांनी उमेदवारांना शारीरिक तयारी अभ्यास पद्धती आणि भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास विविध अकॅडमींचे प्रशिक्षक, विद्यार्थी, तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीमचे सदस्य उपस्थित होते. जिल्हा महिला उपाध्यक्षा, जिल्हा सल्लागार आणि संघटक यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या पोलीस निराकारण समन्वय समितीचे सदस्य राहुल दुबाले, मुंबई/पालघर जिल्हा अध्यक्ष मनीष जयस्वाल, आणि पालघर जिल्हा महासचिव मंगेश उईके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button