वसई व नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट व सरकत्या जिन्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते लोकार्पण

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते वसई रेल्वे स्टेशनवर दोन लिफ्ट व दोन सरकते जिन्याचे शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी लोकार्पण करण्यात आले. या लिफ्ट व सरकत्या जिन्याचा उपयोग प्रवासी जनतेला सह विशेषता करून जेष्ठ नागरिक रुग्ण व अपंगांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.तसेच नालासोपारा येथे दोन लिफ्टचे लोकार्पण खासदार गावित यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते व रेल्वेचे डी आर यु सी सदस्य केदार काळे व वसईचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर,रेल्वेचे राजकुमार शर्मा व अनेक मान्यवर उपस्थित होते .
या लोकार्पणा वेळी खासदार राजेंद्र गावित म्हणाले की वसई रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळावा म्हणून मी भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. तसेच भविष्यात विरार रेल्वे स्टेशन हे खूप सुंदर रेल्वे स्टेशन होणार आहे .माझ्या मतदारसंघातील नायगाव ते घोलवड मधील रेल्वे स्टेशनवर सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच दैनंदिन रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून मी सतत प्रयत्न करीत असतो .
भविष्यात लोकलची संख्या वाढणार आहे व रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकारक होणार आहे. या लिफ्टचे व सरकत्या दिनाचे लोकार्पण करताना पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अशोक मिश्रा व डी आर एम नीरज वर्मा त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.



