महाराष्ट्र

विठ्ठलराव गायकवाड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव निवृत्तीराव गायकवाड यांचा पन्नासावा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .याप्रसंगी श्री बसवराज मनोरे (निमंत्रित सदस्य महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल ,एआयओसीडी चे डायरेक्टर ),सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्र गिस्ट चे अध्यक्ष श्री व्यंकटेश पुजारी ,सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सागर पाटील ,अकलूज मराठा व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्री नितीन खराडे ,रोटरी क्लब सराटी डिलाईटचे अध्यक्ष श्री जगदीश कदम ,सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्र गिस्ट चे सचिव श्री राजेश विरपे,सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्र गिस्ट चे खजिनदार श्री प्रशांत खलीपे, श्री हेमंत पाटील तसेच जिल्हा संघटना व तालुका संघटनेचे पदाधिकारी व अनेक केमिस्ट बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.प्रारंभी राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी व विठ्ठलराव गायकवाड यांचे सवाद्य मिरवणूक ओपन जिप्सी मधून अकलूज केमिस्ट भवन पासून कार्यक्रम स्थळ पर्यंत काढण्यात आली .यावेळी गुलाब पुष्पांची उधळण व फटाकायांची अतिशबाजी करण्यात आली व क्रेनच्या साह्याने शंभर किलो वजनाच्या पुष्पहार आणि त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

यावेळी निमा संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ अमोल माने, ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ आयुर्वेदाचे डीन प्राचार्य डॉक्टर प्रशांत निंबाळकर ,सर्प मित्र व आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक प्राध्यापक धनंजय देशमुख , अनिल अन्नदाते गुरुजी यांनी आपल्या मनोगतातून विठ्ठलराव गायकवाड यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले .विठ्ठलरावांच्या जीवन प्रवासातील संघर्ष जिद्द चिकाटी, माणसे जोडण्याची कला यावर प्रकाश टाकला.

यावेळी बोलताना विठ्ठलराव गायकवाड म्हणाले की आज मी जो उभा आहे ते माझ्या वडिलांनी शिकवलेली शिस्त, कुटुंबाचे संस्कार आणि पाठिंबा तसेच माझे मित्र माझ्या सुखदुःखात प्रसंगी उभा राहिले त्यामुळे मी इथे इथपर्यंत पोहोचू शकलो.केमिस्ट हृदय सम्राट, अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्र गिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा .श्री .जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे हे माझ्यासाठी नव्हे तर आपल्या सर्व केमिस्ट बांधवांसाठी दैवत आहेत.
तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना केमिस्ट भवन ,फार्मसी डे ,रक्तदान शिबिर ,वारकऱ्यांना मोफत औषध तपासणी ,केमिस्टच्या अडीअडचणी सोडवणे यासारखी कामे ही केवळ आपना सर्वांच्या सहकार्यामुळे करू शकलो. येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे प्रेम व आशीर्वाद मला मिळतील अशी खात्री वाटते.कार्यक्रमाचे वेगळेपण जपत प्रमुख उपस्थितांना 100 वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा बोरवके वस्ती आनंदनगर येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमामध्ये जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तसेच विठ्ठलराव गायकवाड यांच्या मातोश्री श्रीमती द्वारका निवृत्तीराव गायकवाड यांचा विशेष सन्मान मंगळवेढा तालुका तहसीलदार सौ. शितल हर्षवर्धन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड (माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल ,मुख्य समन्वयक भाजपा ,राष्ट्रवादी ,शिवसेना ,वैद्यकीय आघाडी, महाराष्ट्र राज्य )यांनी केले , प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री विजय जगताप तर आभार डॉक्टर हर्षवर्धन गायकवाड (अध्यक्ष,मिशन आयुर्वेदा महाराष्ट्र राज्य व उपाध्यक्ष ,निमा संघटना माळशिरस तालुका ) यांनी केले . कार्यक्रम पार पाडण्यासाठी द्वारकाधिश सेवाभावी संस्थेचे सदस्य व मित्रपरिवार यांची विशेष साथ लाभली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button