महाराष्ट्र

अहमदनगर कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे व त्यांचा खाजगी इसम गुरमीत सिंग नाशिक पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या जाळ्यात अटक

.टाईम्स नाईन न्यूज मराठी नेटवर्क.
प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.

अहमदनगर कोपरगाव येथील वाळू वाहतुकीच्या गाडीवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सहमताने त्यांचा खाजगी इसम गुरमीत सिंग यांने वाळू वाहतूक करणाऱ्या गाडी मालकाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार केल्याप्रकरणी या दोघांना शुक्रवारी रात्री अँटी करप्शन ब्युरो नाशिक पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील आणि पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अहमदनगर कोपरगाव येथील वाळू वाहतूक करणारा (33 वर्षीय) पुरुष तक्रारदार यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी अहमदनगर कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांचा खाजगी इसम यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. म्हणून त्यांनी याबाबत या खाजगी इसमाची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो नाशिक कार्यालयात केली होती. या तक्रारीची पडताळणी या कार्यालयामार्फत करण्यात आल्यावर श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर(पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक), व श्री.नारायण न्याहाळदे (अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र) तसेच श्री.नरेंद्र पवार (पोलीस उपअधीक्षक नाशिक)यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील आणि पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रवीण महाजन,प्रभाकर गवळी, चालक पोलीस नाईक संतोष गांगुर्डे या पथकाने शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी सापळा रचून पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून गुरमीत सिंग दडियाल (वय वर्ष 40) (खाजगी इसम)यांनी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली ही लाच त्यांनी अहमदनगर कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे (वय वर्ष 44)यांच्या सांगण्यावरून स्वीकारली म्हणून या दोघांना अटक करून त्यांच्यावर शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button